ग्रामपंचायत जांभूळ, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी - एक पाऊल सशक्त ग्रामस्वराज्याकडे!
ग्रामपंचायत जांभूळ, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी – एक पाऊल सशक्त ग्रामस्वराज्याकडे!
नमस्कार, ग्रामपंचायत जांभूळ येथील आपल्या सर्व ग्रामस्थांनो!
महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान“ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हे अभियान प्रभावीपणे राबवून ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळवून देण्याचे सोनेरी संधी आपल्या सर्वांच्या सहकार्याने साध्य करूया.
🔷 अभियानाचा उद्देश काय?
ग्रामपंचायतीमध्ये १००% ऑनलाइन सेवा, उत्पन्न वाढवणे आणि लोकाभिमुख प्रशासन यासह सुशासन प्रस्थापित करणे. याशिवाय, या अभियानात जलसमृद्धी, स्वच्छता, हरितगाव, उपजीविका विकास आणि सामाजिक न्याय या उद्दिष्टांचा समावेश आहे. अभियानाची अंमलबजावणी तालुका, जिल्हा, विभाग व राज्य या चार स्तरांवर करण्यात येते.
🔷 ग्रामपंचायतींसाठी प्रोत्साहन:
या अभियानात चांगली कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना आर्थिक पुरस्कार दिले जातात. राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाच्या ग्रामपंचायतीस ५ कोटी रुपये, तर द्वितीय व तृतीय क्रमांकास अनुक्रमे ३ कोटी व २ कोटी रुपये देण्यात येतात. या अभियानातून गावागावात स्पर्धात्मक विकासाला चालना मिळत आहे.
🔷 ग्रामपंचायत जांभूळ यांची भूमिका:
ग्रामपंचायत जांभूळ यांनी या अभियानांतर्गत आपल्या ग्रामविकास आराखड्यात आरोग्य, शिक्षण व उपजीविका वाढ या बाबींवर विशेष भर देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व ग्रामस्थांनी श्रमदान, ऑनलाइन सेवांचा लाभ, सार्वजनिक सहभाग याद्वारे या अभियानाला यशस्वी करावे.
✊ एकत्र येऊया आणि जांभूळ गावाला समृद्धीच्या दिशेने नेऊया!











